Ad will apear here
Next
‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’
सेवक संमेलनात राजू मदनकर यांचे प्रतिपादन


गडचिरोली : ‘आपले जीवन जगण्यासाठी आणि त्याची उंची वाढविण्यासाठी मानवाला गरज असेल, तर परमात्मा एक हे मार्ग स्विकारणे गरजेचे आहे. म्हणूनच मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे,’ असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी केले.

धानोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलनाप्रसंगी ते बोलत होते. यात अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, बेटी बचाव-बेटी पढाव, कुटुंब नियोजन आदी विषयांवर जनजागृती करण्याच्या हेतूने हे सेवक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. धानोरा येथील आदिवासी गृह निर्माण सहकारी मर्या.च्या पटांगणात हे संमेलन झाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, तहसीलदार गणवीर, नगराध्यक्ष लिना साळवे, मंडळाचे सदस्य आणि संमेलनाचे उद्घाटक टिकाराम भेंडारकर, संजय चाचेरे, गोपाल बावनवाडे, माणिक मेश्राम, डॉ. गोविंदराव दोनाडकर, आयोजक व मार्गदर्शक दिवाकर ठेंगरे उपस्थित होते.

मदनकर म्हणाले, ‘आपण जो काम करीत आहोत, असा मानव धर्म जगात दुसरा निष्काम करणारा कर्म होऊ शकत नाही. आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्या शिकवणीने  प्रत्येक सेवकाने चांगले वागले पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्यापासून काही चांगले कामे होऊ शकते का हे पाहणे गरजेचे आहे.’

आमदार डॉ. होळी, माजी आमदार डॉ. उसेंडी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी १५ प्रकारच्या झांकी सादर केल्या. कार्यक्रमात आजुबाजूच्या परिसरातील सुमारे १५ हजार नागरिकांची उपस्थिती होती.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZUYBX
Similar Posts
धानोरा येथे सेवक संमेलन गडचिरोली : धानोरा येथे सात फेब्रुवारी २०१९ रोजी मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, बेटी बचाव-बेटी पढाव, कुटुंब नियोजन आदी विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.
गोंडवाना विद्यापीठात मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गडचिरोली : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरोथान स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले होते.
‘लोकबिरादरी’साठी ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ पुणे : हेमलकसा (गडचिरोली) येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील जखमी वन्यप्राण्यांच्या अनाथालयाच्या मदतीसाठी येथील लोकबिरादरी मित्रमंडळातर्फे ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स- सीझन ३’ या विशेष कार्यक्रमाचे सलग तिसर्‍या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम २२ फेब्रुवारीला गडचिरोली : जिल्हा टास्क फोर्स समितीची सभा अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांच्या अध्यक्षतेखाली २० फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आली. या सभेला डॉ. सुनील मडावी, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language